Type Here to Get Search Results !

मलकापूर तालुक्यात वादळाचा कहर: सोलर पंप उन्मळून पडल्याने शेतकरी अडचणीत

 


*मलकापूर, दि. 7* – काल रात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी *सोलर कृषी पंपांचे स्ट्रक्चर उन्मळून पडले असून पॅनल फुटले आहेत*. सोबतच शेती पिकाचेही नुकसान झाले आहे.


ऐन मशागतीच्या काळात पंप बंद पडल्याने शेतकऱ्यांपुढे पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. 


बाधित शेतकऱ्यांनी *प्रशासनाने तात्काळ पथके पाठवून पंचनामे करावेत व PM कुसुम योजनेंतर्गत विमा व शासकीय मदत द्यावी*, अशी मागणी केली आहे.

मलकापूर वार्ताहर

Post a Comment

0 Comments