Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या दणक्याने महावितरण नरमले: 48 तासात बेलाडच्या शेतात वीज, चोरट्यांवर गुन्हे दाखल

 

*मलकापूर (प्रतिनिधी):* शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना नेहमीच आघाडीवर असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मलकापूर तालुक्यात आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख *दीपक चांभारे पाटील* यांच्या नेतृत्वाखाली *दिनांक 5 मे 2026* रोजी महावितरण कार्यालयावर काढण्यात आलेल्या धडक मोर्चा नंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, अवघ्या 48 तासांत बेलाड येथील शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.

आक्रमक घेरावानंतर महावितरण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली. याचाच परिणाम म्हणून मौजे बेलाड, खापरखेड शिवार, गट क्र. ३० मधील शेतकरी *धनंजय वसंतराव संबारे* यांच्या शेतातील पोलवरील तार जोडणीचे रखडलेले काम दि. 7 मे 2026 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. मुंधडा पेट्रोल पंपासमोरील या शेतात विजेअभावी सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला होता. आता वीजपुरवठा सुरळीत झाल्याने संबारे कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.

*चोरीच्या तारांबाबत गुन्हे दाखल, चांभारे यांचा पाठपुरावा*  
दरम्यान, तालुक्यातील विविध ठिकाणाहून विजेच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण विभागाला जाग आली असून, विभागामार्फत मलकापूर येथील विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरट्यांविरुद्ध रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. "शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा सुरूच राहील," अशी ठाम भूमिका तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी मांडली.

*"शब्द दिला, तो पाळला"* या ब्रीदवाक्याला जागत सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याबद्दल दीपक चांभारे पाटील यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. बळीराजाच्या प्रत्येक अडचणीत शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

> *"शब्द दिला, काम केलं! हीच शिवसेनेची ओळख!!"*  
> _- दीपक चांभारे पाटील, तालुकाप्रमुख, शिवसेना मलकापूर_

Post a Comment

0 Comments