Type Here to Get Search Results !

कचरा घंटागाडीच्या उपक्रमातुन सर्वसामान्यांमध्ये समाधान..

 


मौजे बेलाड येथे ग्रामपंचायत उपक्रमातून गावात सर्व दूर कचरा घंटागाडी फिरवीण्यात येत आहे. यामुळे कचरा व्यवस्थापनास मदत होऊन गावातील सार्वजनिक स्वच्छतेस हातभार लागत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी होत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु असं असलं तरी कचरा गाडी फिरवीण्याच्या वेळेत अनियमिता आढळून येत असल्याने नागरिकांना अल्प प्रमाणात त्रासही सहन करावा लागत आहे. परंतु भविष्यात याबाबत सकारात्मक पाऊल उचलून घंटागाडी नियमित वेळेत फिरेल याबाबत अपेक्षा ही व्यक्त होत आहे. ग्राम स्तरावर ही योजना ग्राम स्वच्छतेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून याबाबत समाधानही व्यक्त होत आहे. येत्या काळात अशाच प्रकारच्या ग्रामहिताच्या अनेक योजना फक्त कागदावरच न राहता त्यांना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या आमलात आणून गाव विकासासाठी सहकार्य व्हावे या अपेक्षेतून गावातील विद्यमान प्रभारी सरपंच उपसरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे ग्रामवासीयांकडून खूप खूप अभिनंदन व आभार.. 🙏

Post a Comment

0 Comments