मौजे विवरा येथील शेतकरी यांचे मागील 12 दिवसापासून मलकापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. कल्पा पावर सोलर कंपनीने शेतकऱ्यांना गाफील ठेवत शेतकऱ्यांच्या परंपरागत वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून तो रस्ता अडविला असल्याने हे उपोषण सुरू होते. या प्रकरणी माननीय तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी मागील 12 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या आमरण उपोषणाला कोणताही प्रतिसाद दिला नाही किंबहुना याउलट शेतकऱ्यांची बाजू योग्य नसून त्यांची रस्ता मागणीची असलेली मागणी खारीच केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संतप्त भावना होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांचे समाधान करणे व पुढील आंदोलनाला योग्य दिशा देणे याची नितांत आवश्यकता होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन अशी एकंदरीत बाजू शेतकऱ्यांच्या विरोधात असताना या प्रकरणाला योग्य व निर्णायक दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे झाले होते त्यासोबतच आंदोलनकर्त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याने या संवेदनशील व रास्त असलेल्या मागणीला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मलकापूर शहराचे विद्यमान नगरसेवक माननीय प्रसाद भाऊ जाधव, यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढत त्यांच्या पुढील निर्णायक लढण्यासाठी आश्वासन देत उपोषणाची सांगता केली. यामध्ये ऍडव्होकेट मोरे साहेब, दीपक चांभारे पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत, सचिन शिंगोटे, डॉ. हनुमान भगत व इतर सामाजिक तथा राजकीय नेते मंडळींनी शेतकऱ्यांची समजूत काढत तूर्तास आंदोलन स्थगित केले. यापुढील आंदोलन हे न्यायालयीन होणार असल्याचे मतही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले..


Post a Comment
0 Comments