मागील दहा दिवसापासून कल्पा पावर सोलार कंपनी विरोधात विवरा येथील शेतकऱ्यांच अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासन प्रशासनाची कुचकामी भूमिका पाहता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते माननीय रविकांत तुपकर यांनी काल संध्याकाळी उपोषण स्थळी भेट देत आक्रमक पवित्रा घेतल्याच दिसून आलं तसेच प्रशासनाचे अधिकारी माननीय तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना धारेवर धरत शेतकऱ्यांची बाजू रास्त असल्याच स्पष्टपणे सांगितल. शेतकऱ्यांचा रस्ता अडविण्याच्या या गंभीर प्रश्नावर प्रशासनाचे अनेक अधिकारी मुंग गिळून गप्प आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी कंपनीकडून पैसे घेतले असावेत असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. गाव नकाशावर स्पष्टपणे उल्लेख असणारा विवरा - देवधाबा गाव जोड रस्ता हा शेतकऱ्यांचा हक्काचा असून तोच त्यांना मिळावा. हा रस्ता अतिक्रमित करून कल्पा पावर कंपनीने जो शेतकरी विरोधी घाट घातला यात माननीय तहसीलदार समाधान सोनवणे यांची भूमिका कंपनी हितासाठी असून ते दबावाखाली काम करत असल्याच एकंदरीत चित्र असल्याचं स्पष्ट मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केल. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावापेक्षा शेतकरी महत्त्वाचा नाही का..? कंपनीच्या हितापेक्षा शेतकरी हित जोपासत सत्सक विवेक बुद्धीने विचार करून शेतकऱ्यांच्या सत्य असलेल्या बाजूने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचा जुना वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करावा आणि हा निर्णय दोन दिवसातच घ्यावा अन्यथा शेतकऱ्यांचा आगडोम उसळेल व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंबहुना बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखं आघटित सुद्धा घडू शकत याची सर्वस्वी जबाबदारी माननीय तहसीलदार यांची राहील. अशा स्पष्ट शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सज्जड दम दिला व पुढील दोन दिवसात आंदोलनाची धुरा स्वतःच्या हातात घेत असल्याचं देखील जाहीर केलं. त्यामुळे शासन आणि प्रशासन नेमकं कंपनी हितासाठी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली निर्णय घेतील की, सत्सक विवेक बुद्धी व सत्याचा परिचय देत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे..


Post a Comment
0 Comments