Type Here to Get Search Results !

विवरा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष...

 


मौजे विवरा येथील शेतकऱ्यांचा शेत रस्ता कल्पा सोलार कंपनी ने अडवून शेतकऱ्यांची वाट कायमची बंद केली. पर्यायी रस्त्याच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेकडो शेतकऱ्यांचा शेत रस्ता कायमचा अतिक्रमित केला. शासन प्रशासनाने देखील या बाबीवर गांभीर्य न दाखवता कंपनी पुरस्कृत भूमिका घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय नाही कंपनीला अभय, लोकशाहीचे मारेकरी मात्र निर्भय. सलग 9 दिवसापासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण, असंख्य शेतकरी महिलांचा तहसील कार्यालयातील तीन दिवसांपासून चा कायमचा मुक्काम व ठिय्या, प्रशासनाची मुजोरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची भरलेली तिजोरी चे वर्णन करीत आहे. काळ आणि परिस्थिती बिकट असली तरी शेतकरी क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शासन प्रशासनाच्या जुलमी अन्याया विरुद्ध सुरू असलेली शेतकरी हक्काची लढाई अजून कुठपर्यंत लांबणार यावर प्रश्नचिन्ह आहे..? येत्या काळात शेतकऱ्यांचा हक्काच्या लढाईत शेतकऱ्यांचा विजय होईलच, हक्काचा असलेला रस्ता मिळेलच परंतु प्रशासनाने घेतलेली शेतकरी विरोधी भूमिका उभा महाराष्ट्र पाहतोय...

Post a Comment

0 Comments