मौजे विवरा येथील शेकडो शेतकऱ्यांचा परंपरागत असलेला वहिवाटीचा रस्ता कल्पा सोलार कंपनीकडून अडवीण्यात आल्याचा गंभीर आरोप करत विवरा येथील शेतकरी सिताराम बळीराम ढोण व इतर शेतकरी मलकापूर तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करीत आहे. दिनांक 25- 01- 2026 पासून सुरू असलेल्या या अन्नत्याग उपोषणाचा आजचा सहावा दिवस असूनही शासन प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. या अगोदर रस्त्या संदर्भात चार वेळा विविध उपोषणाच्या व आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शासन दरबारी धाव घेतली परंतु बलाढ्य कंपनी पुढे शेतकऱ्यांचा निभाव काही लागेना..? शेतकऱ्यांपेक्षा प्रशासन हतबल तर नाही ना..? असे असताना शेतकरी आत्मविश्वासाची डोर अजूनही जिवंत आहे. शेतकऱ्यांचा रस्ता खुला करण्याबाबत तहसील कार्यालयाचे आदेश परिपत्रक असतानाही सर्रासपणे आदेशाची पायमल्ली होते, नेमका दोषी कोण..? कंपनीला अभय कोणाचे..? स्थानिक प्रतिनिधींची भूमिका काय..? असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सलग 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे उपोषण कर्ता सिताराम बळीराम ढोण यांची प्रकृती अधिक खालावली आहे.
200+ BP वाढल्याने जीविताचा धोका निर्माण झाला आहे. अशा एकंदरीत परिस्थितीत शेतकऱ्यांचा आक्रोश अधिक तीव्र होत असल्याने माननीय तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे..



Post a Comment
0 Comments