मौजे मलकापूर बेलाड येथील, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ह.भ.प श्री चंद्रभान काशीराम क्षीरसागर यांच काल दिनांक 28- 1- 2026 रोजी संध्याकाळी वयाच्या 70 व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद अस निधन झाल. चंद्रभान आबा यांच्या अकस्मित जाण्याने वारकरी सांप्रदायात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. संपूर्ण हयात भर देव देश आणि धर्म या विचारांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने बेलाड च्या मावळ मातीत सांप्रदायाचा अखंड पाया त्यांनी निर्माण केला, त्याचबरोबर संपूर्ण जीवन त्यासाठी समर्पित केले. परमेश्वराची अखंड भक्ती करत असताना राग आणि लोभ याचा स्पर्शही न होऊ देणारी निश्चितच या शेवटच्या पिढीचा हा अंत असावा. विचारांच्या जडणघडणीत स्वतःच्या अस्तित्वाची छाप उमटवीत असताना कोणाशीही स्पर्धा नाही, कोणाशीही तुलना नाही, फक्त सेवा, सहकार्य आणि समर्पण या भावनेन आजीवन समाजाची सेवा करणाऱ्या या वारकरी सांप्रदायाच्या युगंधर व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली.. 🌹
सुनिल बाबुराव संबारे.. ✍️

Post a Comment
0 Comments