Type Here to Get Search Results !

आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा, ह.भ.प श्री महादेव आनंदा क्षीरसागर यांचे वृद्धपकाळाने निधन..


ज्यांच्या पावलाने जीवनाचा मार्ग सुशोभित केला, ज्यांच्या  विचारांनी समाजाला नवी दिशा दिली. आपल्या सांप्रदायिक व सामाजिक कार्य तथा संस्काराच्या माध्यमातून सर्व दूर परिचित असलेले आदर्श व्यक्तिमत्व ह.भ.प श्री महादेव आनंदा क्षीरसागर यांचे वृद्धपकाळाने काल रात्री वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. आपल्या जीवन कार्यामध्ये महादेव आबांनी अतिशय समाज उपयोगी, लोकउपयोगी आणि देश, समाज संप्रदाय आणि राष्ट्र यांच्या हिताची अनेक कामे केली आहे. तुका म्हणे मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे अशी कीर्ती त्यांच्या जीवनभरातील कार्याला लाभलेली आहे. जिंदगी तो उसी की होती है जो ओरो के लिए कुछ करना चाहता हो, वरणा अपने लिये तो हर कोई जीता है. ही उक्ती आबांच्या जीवनाला यथार्थपणे लागू होते म्हणूनच मरावे परी कीर्तिरूपी उरावे असा मूर्तिमंत आदर्श आबांनी मागे ठेवलेला आहे. मृतात्म्यास शांती मिळो व त्यांच्या कुटुंबीयांना दुःख पेलण्याच ईश्वर सामर्थ्य देवो अशी श्रद्धांजली अर्पित करतो..🌹🌹🌹

    सुनिल बाबुराव संबारे बेलाड.. ✍️

Post a Comment

0 Comments