![]() |
कलियुगी संत झाले फार, संत नव्हते पण तुझी कीर्ती अपार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचे कारण म्हणजे. बेलाड येथील ग्रामीण विकास विद्यालय या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. वसंतरावजी संबारे. ज्या काळात शैक्षणिक क्षेत्र एका नाविन्यपूर्ण बदलाच्या अपेक्षेत होतं त्याच काळात क्रांतीच्या या सूर्याने समाजाला असलेली शिक्षणाची खरी गरज ओळखून ग्रामीण विकास विद्यालय या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. फक्त त्यावरच ते थांबले नसून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत याचा प्रचार, प्रसार आणि लाभ मिळावा यासाठी अविरत प्रयत्न केले. ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाचा उच्चत्तम स्तर, शिक्षणासाठी असलेली आधुनिक कार्यपद्धती व शिस्तबद्धता पोहचवून एका आधुनिक पर्वाची सुरुवात केली. आणि आज लावलेले त्या शिक्षण रुपी रोपट्याचे एका महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. ते डॉ. आबांच्या आधुनिक आणि ऐतिहासिक संकल्पनेमुळेच..
पंचक्रोशीतील सर्वात मोठे धर्माळ संस्थान म्हणजे बेलाड येथील हनुमान संस्थान याची विशिष्ट ओळख आहे. या संस्थेच्या अध्यक्ष पदापासून ते पंचायत समिती सभापती पद भूषवित असताना आबांनी पारदर्शीपणे प्रशासकीय कारभार व हनुमान धर्माळ संस्थांनची अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची नोंद इतिहासात उपलब्ध आहे. याचेच फलस्वरूप आज बेलाड गावात पंचक्रोशीतील सर्वात मोठे हनुमान मंदिर आणि सभामंडप सेवेसाठी उपलब्ध आहे. एकाच काळात एकाच वेळी धर्मसत्ता राजसत्ता आणि शिक्षण सत्ता या त्रिरत्नातून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य बेलाडच्या या पावन भूमीतून सबंध पंचक्रोशीत पोहचल ते आबांच्या अलौकिक कार्यामुळेच..
अशा या ऐतिहासिक महानायकाची आज जयंती असल्यामुळे विनम्र अभिवादनातून हे बोल अर्पण.. 🙏


Post a Comment
0 Comments