![]() |
मलकापूर बेलाड फाटा सर्विस रोडवर तात्काळ गतिरोधक आणि महिला प्रसाधन गृह निर्माण करण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून डॉ. भगत यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट डायरेक्टर यांना याआधी निवेदन दिले होते.
या मागणीचा उद्देश रस्त्यावरील अपघात टाळणे आणि महिला यात्रिकांना सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. अनेक स्थानिक निवासी, शेतकरी आणि वाहनचालकांनी या मागणीला समर्थन दिलेले होते.
आपल्या मागणीला जोर देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून उपोषणाच्या हालचाली सुरु होत्या. सोबतच त्यांच्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने व्यक्त होत होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट डायरेक्टर यांनी संबंधित निवेदनाची दखल घेत दिनांक 21 डिसेंबर रोजी बेलाड फाटा सर्विस रोडवर गतिरोधक बसविण्या बाबतचा निर्णय घेतला आणि गतिरोधक बसविण्यात आले.. त्याचबरोबर निधी उपलब्ध होताच महिलांसाठी स्वच्छतागृह बसविण्याबाबतचे आदेशही निर्गमित केल्याची माहिती आहे.. यामुळे दररोज हजारो शेतकरी, वाहन चालक तथा यात्रिकांचा प्रवास सुखकर आणि भयमुक्त होत असल्याने सर्वसामान्यात आनंदाचे वातावरण आहे.. 🙏

Post a Comment
0 Comments