विद्यार्थी व शिक्षकांच्या वैज्ञानिक कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणारे मलकापूर तालुकास्तरीय 53 वे विज्ञान प्रदर्शन दिनांक 10/12/2025 रोजी डी. इ. एस. हायस्कूल व जुनियर कॉलेज दाताळा तालुका मलकापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
यामध्ये अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य स्पर्धेमध्ये आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर येथील सौ.भाग्यश्री मनोज चिमणपुरे यांच्या "अनुभवातून शिक्षण "या साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त होऊन त्यांची जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनीकरिता निवड करण्यात आली आहे.याच गटात विद्यालयातील कु.स्मिता मुरलीधर कोलते सह.शिक्षिका यांच्या "टॉवर ऑफ ब्रम्हा ",या माथेंटॅमटिक पझल , या शैक्षणिक साहित्याने जे प्राथमिक स्तरापासून पासून तर उच्च माध्यमिक स्तरापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अत्यंत उपयुक्त आहे, द्वितीय क्रमांक प्राप्त केलाआहे .त्याचप्रमाणे विद्यार्थी उपकरण निर्मिती प्राथमिक गटात कु. प्रत्युषा दत्तात्रय तायडे वर्ग 4 हिच्या सौर ऊर्जा व आधुनिक गाव आणि कु. देवांशी रोशन तायडे वर्ग 3 हिच्या कचरा व्यवस्थापन व बायोगॅस निर्मिती या उपकरणांचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.या विद्यार्थ्यांना उपकरण निर्मितीसाठी श्री नितीन राजाराम पढार सर व कु. स्मिता मुरलीधर कोलते मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या या भरीव कामगिरी करिता मा.संचालक श्री संजयजी चांडक सर व शाळेचे मुख्याध्यापक आ. श्री चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.

Post a Comment
0 Comments