मौजे बेलाड येथे दिनांक 13 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कडून शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिव सप्ताहास संपूर्ण बेलाड ग्रामवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावात प्रथमच होणारा ऐतिहासिक शिव सप्ताह संस्कार आणि संस्कृतीचा वारसा अधोरेखीत करत आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून लहान बालवयीन मुलं मुलींपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकांमध्ये शिव विचार रुजावा याची विशेष काळजी आयोजकांकडून घेण्यात आलेली आहे. दिनांक 15 व 16 फेब्रुवारी झालेल्या युवा कीर्तनकार ह.भ.प जयाताई सातव महाराज व ह.भ.प विष्णू हिवरखेडे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून झालेल्या कीर्तनाने सुरू असलेल्या शिव सप्ताहास अधिक महत्त्व प्राप्त करून दिले असून बेलाडच नव्हे तर पंचक्रोशीच्या इतिहासात पहिल्यांदाच होणाऱ्या शिव सप्ताहा मुळे गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी होणारा यशस्वी उपक्रम व कार्यक्रम इतिहास घडवणारा ठरत आहे. आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक वारसा निर्माण करणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये महापुरुष व समाज प्रबोधन पर गीते व नाटिका यांचाच फक्त समावेश असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कार्यक्रमावर संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले आहे... 👆



Post a Comment
0 Comments