Type Here to Get Search Results !

नवीन डीपी संदर्भात शेतकऱ्यांचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा आमदार चैनसुख संचेती यांनी दिलेला शब्द पाळला नाही, शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी, घिर्णी भाग 2 मधील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त..

 


मलकापूर घिर्णी भाग 2 गट क्रमांक 459 या क्षेत्रात असलेल्या डीपी वर विद्युत कनेक्शन 50 पेक्षा जास्त असल्याने डीपी वरील विद्युत दाब ओव्हरलोड होत असून वारंवार डीपी आणि शेतकऱ्यांच्या मोटार सतत जळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आणि पुरवठा खंडित राहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भात वारंवार कार्यकारी अभियंता विद्युत महामंडळ मलकापूर यांना लेखी अर्जाच्या माध्यमातून या अगोदरही कळविले आहे. इतकेच नाही तर या गंभीर बाबीची दखल घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून आमरण उपोषण देखील करण्यात आले होते. मलकापूर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री चैनसुख संचेती यांनी उपोषण स्थळी भेट देत लेखी व तोंडी आश्वासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तात्काळ डीपी बसविण्याबाबत आश्वस्त केले होते. परंतु अजूनही शेतकऱ्यांची समस्या जैसी थी तशीच आहे.. त्यामुळे आमदार चैनसुख संचेती यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी तीव्र नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते, डॉ. हनुमान मुरलीधर भगत व शेतकरी बांधव यांनी विद्युत कार्यकारी अभियंता मलकापूर यांना दिनांक 01-12- 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार पुन्हा एकदा तीन दिवसाचा अल्टिमेटम देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे..🙏

त्यामुळे या पार्श्वभूमीवर आमदार चैनसुख संचेती दिलेला शब्द  पाळतात का..? हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.. 🙏

Post a Comment

0 Comments