दिनांक 16 नोव्हेंबर 2025 वार रविवारला श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मलकापूर तर्फे तालुकास्तरीय संस्कृत गीता पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये तीन वर्षापासून तर महिलावर्गांपर्यंत ही स्पर्धा खुली होती या स्पर्धेमध्ये श्रीमद् भगवत गीतेचा पंधरावा अध्यायाचे पठण घेण्यात आले तर सदर स्पर्धेमध्ये आदर्श प्राथमिक विद्यालयाची इयत्ता ३ री (अ ) ची कु.दुर्वा प्रवीण ठोसर हिने प्रथम क्रमांक तसेच प्रथमेश प्रवीण उमाळकर इयत्ता ३ रा ( अ)याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच वर्ग २ (क) मधील हर्षित
सावजी याला प्रोत्साहन पर पारितोषिक मिळाले आहे.
आदर्श प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मधून मधून नर्सरी मधील विराजस कौस्तुभ पाठक याला तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि खुल्या गटामधून आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका कु.स्मिता कोलते यांना सुद्धा द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आणि कोलते मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये आपली संस्कृती जपण्याचे कार्य हे आदर्श प्रायमरी इंग्लिश स्कूल आणि आदर्श प्राथमिक शाळा यांच्या माध्यमातून होत आहे.
स्पर्धेत क्रमांक पटवलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आणि कोलते मॅडमचे संचालक माननीय श्री संजय भाऊ चांडक सर तसेच आदर्श प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री विजय चव्हाण सर आणि आदर्श प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सारिका विजय तायडे यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment
0 Comments