Type Here to Get Search Results !

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सौ जयश्रीताई प्रवीण दादा क्षीरसागर यांचा जनसंवाद दौरा, बेलाड येथे दि 19-11-2025 संध्याकाळी 6 वाजता आयोजित..


दाताळा उमाळी या जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवार म्हणून जयश्रीताई प्रवीण क्षीरसागर यांना चांगलीच लोक पसंती आहे. आदरणीय प्रवीण दादा यांना व्यक्तिशः मानणारा वर्ग खूप मोठा असून दाताळा उमाळी या जिल्हा परिषद सर्कल मध्ये या वर्गाचे विस्तृत असे जाळे आहे. प्रवीण दादा यांचे कित्येक वर्षांपासून सुरू असलेले लोक कार्य, समाजकार्य, आणि शेतकरी हिताची अनेक धोरणे, याचा प्रत्यक्ष प्रभाव गाव खेड्यातील सर्वसामान्य कष्टकरी वा शेतकरी यांच्यामध्ये दिसून येतो. प्रवीण पाटील यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांनी नेहमीच स्वाभिमान आणि समाज ( समाजात राहणारा प्रत्येक बांधव मग तो कोणत्याही जाति वा धर्माचा असो ) हा शीर्ष स्थानी ठेवल्याचा इतिहास आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या या निवडणुकीतही स्वाभिमान आणि समाज यांना जपण्याचे आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेत असलेल्या सौ जयश्री ताई प्रवीण क्षीरसागर यांच्या संवाद दौऱ्याकडे पाहता किंबहुना त्यांची लोक पसंती व हजारोच्या संख्येत असलेला सर्वसामान्यांचा जनाधार खूप काही सांगून अथवा बोलून जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षीय तथा सर्वपक्षीय नेते मंडळींचे याकडे विशेष लक्ष असल्याचे बोलले जात आहे.. 🙏

Post a Comment

0 Comments