दिनांक 6 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात विविध शेतकरी समस्या घेऊन जनसेवा परिवाराचे अध्यक्ष तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते डॉ. हनुमान मुरलीधर भगत यांनी आक्रमक पवित्रा घेऊन उद्भवलेल्या परिस्थितीबाबत किंबहुना शेतकरी समस्येबाबत बाजार समितीचे सभापती यांना अवगत केले होते. यावर सात दिवसात कार्यवाही करा अन्यथा आठव्या दिवशी हजारो शेतकऱ्यांसमवेत आमरण उपोषणाचा इशारा यावेळी दिला होता. नेहमीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या समस्यांना माननीय सभापती महोदयांनी विचारात न घेतल्याने शेतकरी समस्यांवर अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दिलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते डॉ. हनुमान भगत यांचे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 14 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात होत आहे. "प्रमुख मागण्या 👉 1) शेतकरी महिलांसाठी बाजार समितीमध्ये उत्तम प्रकारचे शौचालय असावे. 2) संपूर्ण मार्केट यार्ड मध्ये पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असावेत. 3) मार्केट यार्ड मध्ये आपला शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निशुल्क जेवणाची सोय करण्यात यावी. 4) शेतकऱ्यांसाठी शुद्ध आरोचे थंड पाणी सदैव उपलब्ध असावे. 5) मार्केट मधील बंद अवस्थेत असलेला तोल काटा तात्काळ सुरू करण्यात यावा. 6) मार्केट यार्ड मधील खड्डे तात्काळ बुजवीण्यात यावे इत्यादी.. 🙏

Post a Comment
0 Comments