Type Here to Get Search Results !

आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका कुमारी स्मिता कोलते हिंदू रत्न पुरस्काराने सन्मानित...


 


आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका कुमारी स्मिता कोलते हिंदू रत्न पुरस्काराने सन्मानित... पद्मश्री डॉक्टर मनि भाई मानव सेवा ट्रस्ट, नीति आयोग क्रिडा मंत्रालय भारत सरकार , आय. एस. ओ .नामांकित  संस्थेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता परिषद सरदार वल्लभभाई पटेल जयंती व हिंदू रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक, वृक्ष मित्र ,डॉक्टर रवींद्र भोळे यांनी केले .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. नीलिमाताई मिश्रा, अध्यक्षस्थानी सौ .मेधाताई विश्राम कुलकर्णी राज्यसभा सदस्य, खासदार ,पुणे या उपस्थित होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की ,राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत देश अखंड ठेवला आपण हिंदू आणि आपले हिंदुत्व हे केवळ सरदारांमुळे सुरक्षित आहे त्यामुळे सरदारांच्या कार्याला नमन करण्यासाठी व कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळावी यासाठी डॉक्टर मनीभाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोळे यांनी हिंदू रत्न पुरस्कार आयोजित केला हे कौतुकास्पद आहे पुरस्कार आध्यात्मिक व्यासपीठावरून दिला जात आहे विचार पिठावरून नाही या अशा कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल त्यामुळे हिंदू रत्न पुरस्कारासारखे कार्यक्रम होणे महत्त्वाचे आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉक्टर रवींद्र भोळे यांनी प्रास्ताविकास सांगितले की ,सरदार पटेल हे  निष्ठांत कायदे पंडित ,बॅरिस्टर ,शेतकऱ्यांचे कैवारी महान राष्ट्रभक्त व कणखर नेतृत्व होते. त्यांच्या जयंतीदिनी कार्यक्रम घेणे म्हणजे त्यांचा स्मृती जागवणे होय यावेळी राष्ट्रीय पातळीवरील सरदार वल्लभ भाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार राष्ट्रीय व राज्य पातळीवरील कार्यकर्त्यांना  आपल्या क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्यांना प्रदान करण्यात आला..

आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका कुमारी स्मिता कोलते एम ए इंग्लिश एम एड आदर्श प्राथमिक विद्यालय मध्ये सतरा वर्षापासून सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे कुमारी कोलते मॅडम यांनी शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत भरीव कामगिरी केलेली आहे त्यांनी जवळ जवळ पंधरा वर्षापासून विविध सामाजिक समस्यांवर जनजागृती पर कार्यक्रम राबवलेले आहे आणि त्या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे..

या प्रसंगी कु.स्मिता कोलते मॅडम म्हणाल्या ,हा सन्मान  माझ्या सहकाऱ्यांच्या समर्पणाचा व समाजाच्या विश्वासाचा द्योतक आहे.


माझ्या जीवनातील प्रत्येक पाऊल राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतीसाठी समर्पित राहील. ग्रामीण भागातील शिक्षण,व स्वावलंबनासाठी केलेले कार्य हे सरदार पटेल यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे प्रतिबिंब आहे. हा पुरस्कार मला नव्या ऊर्जेने राष्ट्रसेवा घडविण्याची प्रेरणा देईल.


मी वचन देते की, ही सन्मानाची ज्योत तेवत ठेवून निरंतर  सेवा सुरू ठेवीन. समाजातील प्रत्येक घटकाला बांधिलकीची  जाण व भान देण्याचा प्रयत्न करीन. हा पुरस्कार स्वीकारताना मी सर्व सहकाऱ्यांचे, मार्गदर्शकांचे व कुटुंबियांचे ऋणी आहे.🙏


*जय हिंद! जय भारत!*

Post a Comment

0 Comments