Type Here to Get Search Results !

संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राहुल संबारे यांच्या अध्यक्ष काळात मलकापूर तालुका कार्यकारणीला सर्वाधिक बळ, संभाजी ब्रिगेडच्या तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी शिवमती राजश्री अंकुश चौधरी यांची निवड

 



तथा संघटनात्मक बांधणी तथा महिला सक्षमीकरण या उद्देशाने  संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार अतिशय जोरात सुरू आहे.

 मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे यांचे नेतृत्वात संभाजी ब्रिगेड मलकापूर तालुका कार्यकारणी ला सर्वाधिक बळ मिळाले असून सर्वच समाज घटकांमधील, विशेषता युवकांना व महिलांना संभाजी ब्रिगेड मध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या रंगताना दिसत आहे.

किंबहुना याच धरतीवर दाताळा येथील युवा नेतृत्व राजश्री अंकुश चौधरी

यांची संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली असून संभाजी ब्रिगेड ला जास्तीत जास्त बळ देऊन वाढविण्याचे काम महिला आघाडी च्या मदतीने होईल, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विशेष जबाबदाऱ्या दिल्या असल्याची माहिती आहे.

संभाजी ब्रिगेडचे मलकापूर तालुका अध्यक्ष राहुल भिमराव संबारे यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार जोरात सुरू असून तालुक्यातील नव महिलांची व युवकांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे.

समाजातील सर्वच घटकांना संभाजी ब्रिगेड मध्ये महत्त्वाचे स्थान असून सामाजिक कार्य तथा राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड एक महत्त्वाचा पर्याय असून इच्छुक व्यक्तींनी तालुका कार्यकारिणीशी संपर्क करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल भिमराव संबारे यांनी प्रसारमाध्यमातून केली आहे.

Post a Comment

0 Comments