Type Here to Get Search Results !

आदर्श परंपरेतून व अभिनयातून छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास समाजा समोर



मलकापूर:- भाडगणी गावात नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गा विसर्जनाच्या दिवशी धर्मवीर राजे संभाजी नवयुवक मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत कोणत्याही बँड पथकाचा वापर न करता, गावातील तरुणांनी स्वतः छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांचे रूप धारण करून, पारंपरिक पद्धतीने, जयघोषांच्या निनादात विसर्जन सोहळा पार पाडला. भाडगणी गावात त्या दिवशी संपूर्ण दिवसभरात उत्साहाचे वातावरण होते. धर्मवीर राजे संभाजी नवयुवक मंडळाने साकारलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची झलक दाखवणारी ही मिरवणूक गावात देशभक्ती आणि हिंदुत्वाची जाज्वल्य भावना निर्माण करणारी ठरली आहे. गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होत “जय जिजाऊ! जय शिवराय! जय संभाजी!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. धर्मवीर राजे संभाजी नवयुवक मंडळ भाडगणी यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.. 🙏




Post a Comment

0 Comments