*दि 4 मलकापूर-बेलाड* एकीकडे मलकापूरचे नगराध्यक्ष अतिक भाई जवारी वाले यांनी 'अन्नदाता संघर्ष पदयात्रा' काढून शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तर दुसरीकडे त्यांच्याच नगरपालिकेच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंडमुळे बेलाड येथील हजारो शेतकरी, ग्रामस्थ 8 वर्षांपासून विषारी धुरात गुदमरत असल्याची धक्कादायक बाब सतत समोर येत आहे.
*बेलाड ग्रामपंचायत हद्दीत मलकापूर नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड* असून येथे कोणतीही प्रक्रिया न करता उघड्यावर कचरा जाळला जातो. *मेडिकल वेस्ट, ई-वेस्ट* सह ओला-सुका कचरा दिवसाढवळ्या पेटवला जात असल्याने *कृषी उत्पन्न बाजार समितीत* येणारे हजारो शेतकरी, *3 हजार लोकसंख्येचे बेलाड गाव*, *खेडापती हनुमान मंदिर*, *वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी* तील रहिवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
*8 वर्षांचा संघर्ष व्यर्थ*
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, *2018 पासून* बेलाड ग्रामपंचायतीने या डम्पिंग ग्राउंडविरोधात *वारंवार लेखी ठराव* मंजूर करून मलकापूर नगरपालिकेकडे पाठवले. अनेकदा चर्चा झाल्या, आंदोलने झाली, मात्र प्रत्यक्षात एकही मशीन न बसवता, कचऱ्याचे वर्गीकरण न करता उघड्यावर जाळपोळ सुरूच आहे. कंपोस्टिंगसाठी बांधलेले सिमेंटचे खड्डे रिकामे पडून आहेत.
*"विकासपुरुष की धूरपुरुष?"*
नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिक भाईंकडून बेलाडकरांना मोठी अपेक्षा होती. मात्र त्यांच्याकडूनही कारवाईऐवजी केवळ आश्वासनांचे धूर निघाले. विशेष म्हणजे, नगराध्यक्षांनी नुकतीच 'मानेगाव ते जळगाव' अन्नदाता संघर्ष पदयात्रेदरम्यान शेतकऱ्यांच्या हक्काची भाषा केली. *"बेलाड ते मलकापूर अवघ्या 5 किमीवरील डम्पिंग ग्राउंडवर होणारा शेतकऱ्यांवरील अन्याय नगराध्यक्षांना दिसत नाही का?"* असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
*आरोग्याचा बोजवारा*
विषारी धुरामुळे परिसरात *कॅन्सर, श्वसनाचे व पोटाचे विकार* बळावले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली असतानाही नियम धाब्यावर बसवले जात आहेत. मलकापूर नगरपालिकेचे *आरोग्य सभापती* याबाबत मूग गिळून गप्प असल्याची टीका होत आहे.
> *"हजारो लोकांच्या चितेची आग रोज पेटवणाऱ्याला आम्ही 'विकासपुरुष' म्हणायचं का?"*
> *- सुनिल बाबुराव संबारे, मुख्य संपादक, रोखठोक महाराष्ट्र*
*डॉ. हनुमान भगत यांचा घणाघात*
*"जे नेते 'अन्नदात्या'साठी पदयात्रा काढतात, त्यांनी आधी त्याच अन्नदात्याच्या फुफ्फुसात विष पेरायचं थांबवावं. मानेगाव-जळगावचा प्रवास करण्याआधी बेलाडच्या धुराचा एक श्वास घेऊन बघा, म्हणजे 'संघर्ष' कळेल. भाषणात न्याय आणि कृतीत अन्याय, हाच का 'नव्या राजकारणा'चा अर्थ? बेलाडकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, नगराध्यक्ष साहेब."*
*- डॉ. हनुमान भगत, सामाजिक कार्यकर्ते, बेलाड - मलकापूर*
*काय म्हणतात ग्रामस्थ*
"दररोज इथे कचरा जाळतात. आमच्या पोराबाळांना श्वास घेता येत नाही. एकीकडे स्वच्छ भारत मिशनच्या बाता, दुसरीकडे आमच्या फुफ्फुसात विष. हा अन्याय कधी थांबणार?" अशी व्यथा बेलाडकरांनी ' रोखठोक महाराष्ट्र'शी बोलताना मांडली.
एकीकडे मलकापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष *अतिक भाई ज्वारी वाले* "अन्याय के विरुद्ध आवाज़ उठाना ही लोकतंत्र की असली ताकत है!" म्हणत 'अन्नदाता संघर्ष पदयात्रा' काढून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याचा आव आणत आहेत. आणि दुसरीकडे त्यांच्याच नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमुळे *हजारो शेतकरी, बेलाडचे 3 हजार ग्रामस्थ रोज विषारी धुरात गुदमरत आहेत.* हाच आमचा लाईव्ह रिपोर्ट.
*पत्रकार: सुनिल बाबुराव संबारे*


Post a Comment
0 Comments