Type Here to Get Search Results !

बेलाड गावचे सामाजिक आधारस्तंभ गजानन संबारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा





*बेलाड, दि. 25 मे :* बेलाड गावच्या सामाजिक, सांस्कृतिक व परिवर्तनवादी चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व, तथा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष *श्री. गजानन प्रकाश संबारे उर्फ गजू नाना* यांचा वाढदिवस आज ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री. गजानन संबारे हे बेलाड गावातील एक सुपरिचित नाव असून गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. "एक हाकेवर धावून येणारा" कार्यकर्ता म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यावर्षी गावात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या *सांप्रदायिक शिवजयंती शिव सप्ताह* या ऐतिहासिक उत्सवाचे आधुनिक शिलेदार म्हणून त्यांनी काम पाहिले. या उत्सव समितीचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी संपूर्ण सूत्रे यशस्वीपणे हाताळली.

स्वतः राजकारणापासून अलिप्त राहणारे नाना, मात्र गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद ठेवतात, अशी चर्चा गावात आहे. शेतकरी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान असून *'सदनं कास्तकार'* म्हणून ते ओळखले जातात.

मित्र परिवारात त्यांची ख्याती "संकटात धावून जाणारा मित्र" अशी आहे. छोटा-मोठा भेदभाव न करता ते प्रत्येकाच्या मदतीला उभे राहतात. गावातील तरुण वर्गाचा मोठा गट त्यांच्या विचारांवर चालणारा असून गावातील प्रत्येक परिवर्तनवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अनेकवेळा एकहाती सूत्रे हाताळून त्यांनी सामाजिक प्रश्न सोडवले आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळी व ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. "गजू नाना हे केवळ नाव नसून एक ब्रँड आहे" अशा शब्दांत मित्रपरिवाराने त्यांचा गौरव केला. 

यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, "गजू नानांच्या रूपाने बेलाडला एक आधारवड लाभला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला व नेतृत्वाला आमचा सलाम आहे."

> *"शेतकऱ्याच्या पोराला शेतकरी असल्याचा गर्व असावा, हे गजू नानांनी शिकवलं." - एक ग्रामस्थ*

*पत्रकाराचे दोन शब्द :* 

गजू नाना म्हणजे बेलाडच्या परिवर्तनवादी चळवळीचा कणा आहेत. मी स्वतः या चळवळीचा एक भाग, शिवजयंती उत्सव समितीचा सदस्य आणि त्यांचा सहकारी मित्र म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे काम जवळून पाहतोय. त्यांचा शब्द म्हणजे गावासाठी *दिशा* असते, आणि कृती म्हणजे परिवर्तनाची सुरुवात. सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. बेलाडच्या मातीत असा अवलिया जन्माला आला हे आपले भाग्य. गजू नानांसारखा नेता प्रत्येक गावाला लाभो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.

*- सुनिल बाबुराव संबारे, वार्ताहर.. ✍️*





Post a Comment

0 Comments