बुलडाणा:- महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याची यशस्वीरित्या अंमलबजावणी सुरू असून ही योजना युद्ध पातळीवर कार्यरत असल्याचं एकंदरीत चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या किरकोळ अडचणी वगळता ही योजना योग्य रीतीने कार्यान्वित होत आहे. परंतु असे असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सोलार पंप बसवून देणारा कंत्राटी कामगार मात्र अस्थिर असल्याचे चित्र आहे. कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट घेतलेला मुख्य कंत्राटदार यांच्याकडून सर्वसामान्य कंत्राटी कामगारांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असल्याने कामगारांच्या परिवाराचे आर्थिक चित्र विचित्र झाले आहे. अनेक शासकीय योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करत असताना किंबहुना यांसारख्या अनेक योजना शासनाकडून नागरिकांसाठी मुख्य प्रवाहात आणत असताना खरा श्रमिक यासाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो. शासनाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामध्ये देखील सर्वात खालच्या स्तरावर असणारा कंत्राटी कामगार देखील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे असे असताना कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ नये किंबहुना हातावरच पोट असणारा हा कंत्राटी कामगार याचे वेतन थांबू नये याची दखल कंपन्यांनी घ्यावी. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंत्राटी कामगारांचे असे प्रश्न उद्भवत असताना कंपन्या व कंपन्यांचे मुख्य कंत्राटदार यावर कोणती भूमिका घेतील यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे..?

Post a Comment
0 Comments