दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी काँग्रेस किसान सेल तथा शेतकरी संघटना यांच्याकडून मार्केट बंदची हाक देण्यात आली. जवळपास 5 तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेतून अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला. परंतु ज्या कारणांसाठी शेतकऱ्यांना मार्केट बंद करण्याची वेळ आली त्या मागण्या अत्यंत रास्त होत्या किंबहुना त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊन सर्रासपणे लूट सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते. मागणी क्रमांक 1) ट्रॉलीत खरेदी केलेल्या मालावर हमाली व मापारी याची कपात करू नये, 2) मार्केट मध्ये मालाची विक्री केल्यानंतर किंवा खरेदी झाल्यानंतर व्यापाऱ्याच्या फळीपर्यंत माल पोहोचविण्याचा अतिरिक्त भाडे खर्च व्यापारी यांनी शेतकऱ्यांना परत द्यावा. 3) बाजार समितीमध्ये उपलब्ध असलेल्या काट्यावरच सर्व वाहनांचा काटा करावा. 4) व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल मार्केटमध्ये साठवून न ठेवता त्यांच्या वैयक्तिक गोडाऊनमध्ये ठेवावे. विचार व्हावा आणि फक्त विचार व्हावा ज्या मागण्यांसाठी आज शेतकरी लढतोय त्या मूलभूत गरजांप्रमाणेच मूलभूत मागण्या आहेत जो की शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो हक्क हिरावून मार्केट कमिटी व व्यापारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. शेतकऱ्यांना कोणताही त्रास विशेषता आर्थिक शोषण होऊ नये या विशेष बाबीसाठी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कटिबद्ध असते. परंतु रक्षकच भक्षक झाले असतील तर मग सर्वसामान्य शेतकरी यांना न्याय उरतो कुठं..? किसान काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, सचिन शिंगोटे, डॉ. हनुमान भगत, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, बाळूभाऊ ठाकरे, तथा समस्त शेतकरी बांधव यांच्याकडून व्यवस्थे विरुद्ध उचललेला आवाज प्रामाणिक आणि प्रखर असल्याने अखेर निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. असे असले तरी अजून ही लढाई संपलेली नाही, व्यवस्थेत असलेले आपणच निवडून दिलेले संचालक मंडळातील आपले लोकप्रतिनिधी आठवा, शेतकऱ्यांप्रति असलेली त्यांची भूमिका आठवा निश्चितच उत्तर हेच असेल.. मित्रा ही लढाई अजून संपलेली नाही...🙏


Post a Comment
0 Comments