मलकापूर तालुक्यातील बेलाड गावामध्ये विद्यार्थ्यांनी संघर्षमय परिस्थितीतुन छत्रपती शाहू फुले आंबेडकर या अभ्यासिकेची स्थापना केली आहे. आज रोजी गावातील जवळपास 25 ते 30 विद्यार्थी या अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करीत आहे. परंतु अजूनही विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या या अभ्यासिकेत अनेक गोष्टींचा अभाव आहे. जसे की, विद्यार्थ्यांना अभ्यासिकेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे रस्ता व्यवस्थित नसून वादाच्या भोवऱ्यात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली खोली यामधील काँक्रीट कोबा पूर्णतः खराब झाला असून त्यावर टाइल्स याची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता बसण्यासाठी पर्यायी अशा खुर्च्या आणि टेबल याची देखील कमतरता आहे. असे असतानाही विद्यार्थी असेल त्या परिस्थितीत एकमेकांच्या सहकार्यातून अभ्यासिकेला नवनिर्मित करीत आहे. अभ्यासिकेत अभ्यास करणारे एकूण सर्व विद्यार्थी जेमतेम सर्वसाधारण कुटुंबातील असून शेत मजुरी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय, एकंदरीत हातावर पोट असणारे आपले आई-वडील यांच्याकडून अभ्यासिकेच्या पुनर्निर्माण कार्याकरिता मागावे तरी काय आणि किती हाच नेमका प्रश्न..? शासन प्रशासन मायबाप म्हणून ग्रामपंचायत बेलाड प्रशासनाने या सदर बाबीची दखल घेऊन आम्हा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेच्या नवनिर्माण किंबहुना पुनर्निर्माण कार्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा आणि आमच्या समस्या आणि अभ्यासाकरिता होत असलेल्या अडचणीत दूर कराव्यात याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून होत आहे.. 🙏


Post a Comment
0 Comments