कोल्ही महाबळेश्वर ता.मोताळा येथील स्व.शांताराम संतोष थिटे यांच्या मातीच्या म्हणजेच सावटण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी स्मशानभूमीत थिटे परिवाराकडून वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली व त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली आहे. यामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक देखील होत आहे. परंतु फक्त कौतुक करून चालणार नाही तर थिटे परिवाराकडून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम परिवर्तनवादी विचारधारेचा आधुनिक स्तंभ आहे. त्यामुळे याला विचारात घेऊन सकल समाज बांधवांनी व आदर्शवान ग्रामस्थांनी भविष्यात व्यक्तीच्या मरणोपरांत निसर्गाचा समतोल साधता येईल अशा पद्धतीने उपक्रम राबवून आपल्या प्रियजनांची कायमची आठवण निर्माण करून समाजासमोर आदर्शवान विचारांचा आदर्श प्रस्तापीत करावा हीच काळाची गरज आहे. परंपरागत आलेल्या अनेक अनिष्ट रूढी परंपरा यांना तिलांजली देत वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हणत प्रत्येक गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत वृक्षांची लागवड करून निसर्गाशी बांधिलकी जोपासत आपुलकी निर्माण करावी असा थेट संदेश थिटे परिवाराने या माध्यमातून दिला आहे.. 🙏

Post a Comment
0 Comments