मोताळा तालुक्यातील शेत शिवारात हुमणी अळीमुळे व नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बहुतांश शेतीचा भाग अक्षरशा खरडून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी त्याचबरोबर मोताळा तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार यांची नियुक्ती द्यावी. जेणेकरून मागील सहा महिन्यापासून श्रावण बाळ व निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्या जातील. जवाहर रोजगार हमी योजना व विशेष घटक योजनेच्या विहिरी तात्काळ सुरू करण्यात याव्या. तसेच तालुका कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेले सिमेंट बांधाचे खोलीकरण निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध मागण्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर पाटील यांचे मार्फत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री मकरंद पाटील यांना देण्यात आले. यामध्ये संजय इंगोले, राजू वाघ, ईश्वर चव्हाण, विजय वानखडे, विजयसिंह राजपूत, सचिन पाटील, गणेश शिंदे, मंगेश जाधव, गोपाल राठोड, अनिल गुंड, आदी यांच्या सह्या आहेत.. 🙏

Post a Comment
0 Comments